धोकादायक इमारतीविरोधात आव्हाडांचं उपोषण,सेना-मनसेचंही आंदोलन

October 4, 2013 2:02 PM1 commentViews: 552

jitendra avhad fast04 ऑक्टोबर : ठाण्यातल्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या प्रश्नावर आज शिवसेना आणि मनसे रस्त्यावर उतरले आहे. तर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड ‘हा लढा कशासाठी? तुमच्या माझ्या घरासाठी..’असं म्हणत आमरण उपोषणाला बसले आहे.

 

आव्हाड यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपोषणासाठी बसलेत. 21 सप्टेंबर रोजी मुंब्रा इथं आणखी इमारत कोसळल्यामुळे पुन्हा एकदा इमारतीचा मुद्दा ऐरणीवर आला. इमारतीच्या पुनर्वसनसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी जितेंद्र आव्हाड यांनी 4 ऑक्टोबर रोजी उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं होतं.

 

राष्ट्रवादीने आंदोलनाची घोषणा करताच शिवसेना आणि मनसेही त्यांच्यापाठोपाठ रस्त्यावर उतरली. मुंब्रामधल्या पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मनसेनं जेल भरो आंदोलन केलंय.तसंच मनसेच्या 50 कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी अटक केलीय. या वेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली.

  • Sachin Nalawade

    उपोषण का करता. सरकार तुम्चेच आहे, प्रामाणिक पत्यन करा .

close