‘चॅम्पियन्स’ आजपासून सेमीफायनलमध्ये आमने-सामने

October 4, 2013 1:00 PM0 commentsViews: 680

04 ऑक्टोबर : चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. सेमीफायनलच्या चार टीम निश्चित झाल्यात आणि यात तीन टीम या भारताच्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींना या विकेंडला धडाकेबाज क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे.
रोहित शर्माची ही लाजवाब खेळी कॅप्टनपदाला साजेशी अशीच होती. सेमीफायनल गाठण्यासाठी मुंबई इंडियन्सला पर्थ स्क्रॉचर्सविरुद्धची मॅच मोठ्या फरकानं जिंकण्याशिवाय पर्याय नव्हता. विजयासाठी ठेवलेलं 150 रन्सचं आव्हान मुंबईला फक्त 14.2 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. पण कॅप्टन रोहित शर्माच्या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावर मुंबईनं हे आव्हान शक्य करुन दाखवलं. रोहित शर्माने अवघ्या 24 बॉलमध्ये 4 सिक्स मारत नॉटआऊट 51 रन्स केले. या विजयाबरोबर मुंबईनं धडाक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

chenni vs rr
मुंबई इंडियन्सनं शानदार विजय नोंदवला, पण लीगच्या शेवटच्या मॅचमध्ये बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला मात्र लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. सलग तीन मॅच जिंकत चेन्नईनं याआधीच सेमीफायनल गाठली होती. पण ग्रुपमध्ये अव्वल स्थान राखण्यात चेन्नई अपयशी ठरली. शेवटच्या लीग मॅचमध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगोनं 8 विकेटनं सहज विजय मिळवला.
सेमीफायनलमध्ये चेन्नईची गाठ पडणार आहे ती या स्पर्धेत अपराजित असलेल्या राजस्थान रॉयलशी..राजस्थान रॉयल्सनं लीगमधल्या चारही मॅच जिंकत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केलीय. इतकंच काय तर घरच्या मैदानावर सलग 12 मॅच जिंकण्याचा रेकॉर्डही राजस्थानच्या नावावर जमा झालाय. आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या धक्यातून सावरत राजस्थाननं चॅम्पियन्स लीगमध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.
तीन भारतीय टीमबरोबरच विंडीजच्या त्रिनिदाद अँड टोबॅगोनं सेमीफायनलमध्ये आपली जागा बनवलीय. आता या चार टीममधून येत्या रविवारी चॅम्पियन्स लीगचा नवा चॅम्पियन ठरेल.

close