पाच राज्यात निवडणुकीचे वाजले बिगुल

October 4, 2013 5:34 PM0 commentsViews: 900

Image img_184562_election_240x180.jpg04 ऑक्टोबर :04 ऑक्टोबर : लोकसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकांची निवडणूक आयोगानं घोषणा केली आहे.

यानुसार राजधानी दिल्लीत 4 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर राजस्थानमध्ये 1 डिसेंबर, मध्यप्रदेशमध्ये 25 नोव्हेंबर, मिझोराममध्ये 4 डिसेंबर आणि छत्तीसगडमध्ये 2 टप्प्यात मतदान होणार असून 11 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात आणि 19 नोव्हेंबरला दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे.  यासाठी 18 ऑक्टोबरला अधिसूचना निघणार आहे. या पाचही राज्यांत 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या काळात पेड न्यूज, इव्हीएम मशीनमध्ये छेडछाड आणि मतदारांना फूस लावण्याच्या प्रकारावर निवडणूक आयोग कडक नजर ठेवणार आहे. निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी सांगितलंय.  एप्रिल- मे 2014 मध्ये देशात होणार्‍या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या विधानसभा निवडणुकांकडे पाहिलं जातंय. विशेष म्हणजे यावेळी मतदानाच्यावेळी मतदारांना नकाराधिकार वापरता येणार आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

 • मध्यप्रदेशसाठी 1 नोव्हेंबरला अधिसूचना
 • मध्यप्रदेशमध्ये 25 नोव्हेंबरला मतदान
 • राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान
 • राजस्थानमध्ये 1 डिसेंबरला मतदान
 • दिल्लीत 4 डिसेंबरला मतदान
 • मिझोरममध्ये 4 डिसेंबरला मतदान
 • छत्तीसगडमध्ये 2 टप्प्यांत मतदान होणार
 • पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना 18 ऑक्टोबरला निघणार
 • 5 राज्यांत 8 डिसेंबरला मतमोजणी

======================================================================
2008 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या राज्यांमधली परिस्थिती काय होती?

विधानसभा निवडणुका-2008चे निकाल
======================================================================

दिल्ली

 • एकूण जागा – 68
 • काँग्रेस – 43
 • भाजप – 23
 • बसपा – 2
 • इतर – 1

======================================================================

 मध्य प्रदेश

 • एकूण जागा – 230
 • भाजप – 144
 • काँग्रेस – 70
 • बसपा – 6
 • इतर – 10

======================================================================

छत्तीसगड

 • एकूण जागा – 90
 • भाजप – 50
 • काँग्रेस – 38
 • बसपा – 2

======================================================================

राजस्थान

 • एकूण जागा- 200
 • काँग्रेस – 96
 • भाजप – 78
 • बसपा – 6
 • सीपीएम – 3
 • इतर – 17

======================================================================

मिझोरम

 • एकूण जागा – 40
 • काँग्रेस – 32
 • मिझो नॅशनल फ्रंट – 3
 • इतर – 5

======================================================================

close