संस्था,कारखाने लुटणार्‍यांना तुरुंगात डांबले पाहिजे -शेट्टी

October 4, 2013 7:01 PM0 commentsViews: 594

04 ऑक्टोबर :महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचं आयुष्य उध्वस्त करणार्‍या सहकारी संस्था महाराष्ट्रातील नेत्यांनी खाललेल्या आहेत. अनेक सहकारी संस्था, साखर कारखाने पांढर्‍या कपड्यांतील दरोडेखोरांनी लुटलेल्या आहेत त्यामुळे त्यांनाही लालू प्रसाद यादवांसारखं तुरूंगात डांबलं पाहिजे अशी बोचरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली. तसंच महाराष्ट्रातले साखर कारखाने सुरू करण्यापूर्वी शेतकर्‍यांना समाधान होईल असा उसाचा हमीभाव ठरवा आणि मगंच साखर कारखाने सुरू करावेत अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली. राजू शेट्टी यांची हिंगोली जिल्ह्यातल्या डोंगरकडा येथे जाहीर सभा झाली. कापूस,सोयाबीन आणि उसाला हमी भाव मिळवून देण्याच्या जनजागृतीसाठी राजू शेट्टी यांनी ही सभा घेतली.

close