दाभोलकरांच्या खुनाचा निषेधार्थ रॅली

October 4, 2013 7:05 PM0 commentsViews: 201

04 ऑक्टोबर : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं. अभिनव कॉलेजच्या चौकात दाभोलकरांच्या विचाराचं वाचन करून ही रॅली सुरू झाली होती. अभिनव कॉलेज चौक ते ज्या ठिकाणी दाभोलकरांचा खून करण्यात आला त्या ओंकारेश्वर पुलापर्यंत ही रॅली काढण्यात आली. ओंकारेश्वर मंदिर पुलाजवळ या रॅलीचं सभेत रूपांतर झालं. इथं अंनिस कार्यकर्ती मुक्ता दाभोलकरनं आपले विचार मांडले. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केलं.

close