चिमुरड्यांच्या आहारावर आमदाराच्या नातेवाईकाचा डल्ला

October 4, 2013 7:51 PM1 commentViews: 719

parbhani news04 ऑक्टोबर : लहान मुलांच्या अन्नावर आमदाराच्या नातेवाईकानं डल्ला मारल्याची धक्कादायक घटना परभणीत समोर आलीय. शालेय पोषण आहार योजनेचा काळाबाजार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश झालाय.

 

खुल्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा शालेय पोषण आहारातील 650 पोती तांदूळ परभणी पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

शहरातील एमआयडीसीमध्ये जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडून प्रविण ट्रेडर्स यांना गोदाम भाड्यानं देण्यात आलं होतं. या कंपनीकडे जिल्ह्यातल्या सर्व शाळांना शालेय पोषण आहाराचं तांदूळ वाटपाचं टेंडर देण्यात आलं होतं.

 

 

पण ही कंपनी शाळांना तांदूळ न वाटताच परराज्यात पाठवत असल्याचं समोर आलं. त्यावरुन पोलिसांनी गोदामावर छापा घालत दोन ट्रक ताब्यात घेतले. त्यात प्रवीण ट्रेडर्सचे मालक सुशील जेथलिया आणि त्याचा साथीदार शेख रियाज याला अटक करण्यात आलीय. सुशील जेथलिया हे अपक्ष आमदार सुरेश जेथलिया यांचे पुतणे आहेत. त्यांच्याकडून सहा लाख रुपयांची रोकड देखील जप्त करण्यात आलीय.

  • sureshkumar narute

    Parbhanit sarv shalet Jethliya kami tandul detat

close