मुंबईत आता रात्रीही सुरू राहणार रेस्टॉरंट्स

October 4, 2013 8:15 PM0 commentsViews: 710

mumbai hoatal02 ऑक्टोबर : मुंबईत खवय्यांसाठी खुशखबर.. मुंबईत आता रात्रभर रेस्टॉरंट्स सुरू राहण्यासाठी महापालिकेनं हिरवा कंदील दिलाय.

 

मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या उद्योग आणि व्यवसायातल्या लोकांना जेवण मिळावं यासाठी मुंबईत रात्रभर रेस्टॉरंट सुरू ठेवावेत अशी मागणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली होती.

 

त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. यामुळे मुंबईत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल ही भीती त्यांनी फेटाळून लावली. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला पाठिंबा आहे, या मागणीवर कुणाला काही आक्षेप असतील तर आमची चर्चेची तयारी आहे असंही आदित्य म्हणाले.

 

मुंबई पाठोपाठ आता ठाणे, नाशिक आणि पुण्यात रेस्टॉरंट, मेडिकल आणि दूध विक्रीची केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव त्या त्या महानगर पालिकांमध्ये मंजूर करण्यात येणार आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलीय. आपल्या या मागणीमुळे इतर शहरांमधल्या तरूणांना मुंबईचं नाईटलाईफ अनुभवता येणार आहे अशी भूमिकाही त्यांनी मांडलीय.

close