फळांचा राजा बाजारात दाखल

February 3, 2009 8:48 AM0 commentsViews: 4

3 फेब्रुवारी, मुंबईउन्हाळ्याची चाहूल लागताच सगळयांना प्रतीक्षा असते ती फळांचा राजा हापूसच्या आगमनाची. नवी मुंबईच्या फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याचं आगमन झालं आहे. पाच डझनाच्या एका पेटीला साडे तीन हजार रूपये भाव आहे. मंदीमुळे यंदा कोकणातून येणार्‍या आंब्यांच्या पेट्यांची सख्या रोडावली आहे. दररोज 5 ते 7 पेट्यांची आवक होतेय. मुंबईतून देशभरात हापूसची निर्यात होत असते. यावेळी आंब्याचा दरही कमी असेल असं व्यापार्‍यांनी सांगितलंय. चार डझनच्या एका पेटीची किंमत साडे तीन हजार रुपये असेल.

close