धान्य घोटाळा:मधुकर चव्हाणांचा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न

October 5, 2013 3:53 PM0 commentsViews: 356

madhukar chavan05 ऑक्टोबर : उस्मानाबाद जिल्ह्यातील 2007 धान्य घोटाळ्या प्रकरणातील आरोपींना पालकमंत्री आणि दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण पाठीशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय.

 

भ्रष्टाचार करणारे रेशन दुकानदार निर्दोष असून त्यांच्यावरची कारवाई टाळण्यासंदर्भात मधुकर चव्हाणांनी थेट अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहिलंय. या सर्व पत्राच्या प्रती माध्यमांकडे आल्यानंतर मधुकर चव्हाण यांनी सारवासारव सुरू केलीये. हे पत्र आपण लिहिल्याचं त्यांनी कबूल केलंय.

 

पण याविषयी काय कारवाई करायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांना आहे, असं सांगत त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. याप्रकरणी मधुकर चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपनं केली आहे.

उस्मानाबाद : 2006-07 धान्य घोटाळा

  • - संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत धान्य घोटाळा
  • - 98 लाख रुपयांचा धान्य घोटाळा
  • - तत्कालीन तहसीलदार, कर्मचारी, लघू पाटबंधारे कार्यालयातले कर्मचारी दोषी
  • - 30 रेशन दुकानदारांच्या संगनमतानं केला होता भ्रष्टाचार
  • - विधानसभेत गाजला होता भ्रष्टाचाराचा मुद्दा
close