आंध्रमध्ये दहशतवादी-पोलिसांमध्ये धुमश्चक्री, एका पोलिसाचा मृत्यू

October 5, 2013 4:12 PM0 commentsViews: 516

aandhra05 ऑक्टोबर : आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यातल्या पुत्तूर गावात 6 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचं वृत्त आहे. दहशतवादी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे.

 

अल-उमाह या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी एका घरात लपून बसले असल्याची माहिती मिळतेय. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू आहे. पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये सध्या गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झालाय.

 

या अतिरेक्यांचा सालेममधले भाजप नेते रमेश यांच्या हत्येत हात असल्याचा संशय आहे. तर 2011 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेवेळी याच अतिरेक्यांनी बॉम्ब ठेवल्याचाही संशय आहे.

close