घुसखोरी करणार्‍या 4 अतिरेक्यांना कंठस्नान

October 5, 2013 4:30 PM0 commentsViews: 519

jammu terrsit ded05 ऑक्टोबर : जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न लष्करानं हाणून पाडलाय. केरन सेक्टरमधल्या शाला बाटू गावात घुसखोरीचा प्रयत्न झाला. यावेळी झालेल्या कारवाईत 4 अतिरेक्यांना ठार मारण्यात लष्कराला यश आलंय.

 

याठिकाणी सहा AK 47 रायफल्स, 4 पिस्तुल आणि इतर शस्त्रं जप्त करण्यात आली. दुसरीकडे शाला बाटूमधलं मुख्य ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आलंय. याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अतिरेक्यांनी घुसखोरी केली आहे.

 

मागिल दोन आठवड्यांपासून अतिरेक्यांनी घुसखोरी करून उच्छाद मांडलाय. न्युयॉर्क इथं पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या एक दिवसाअगोदर 26 सप्टेंबर रोजी अतिरेक्यांनी डोकंवर काढलं.

 

जम्मूमध्ये अतिरेक्यांनी पोलिसांच्या चौकीवर हल्ला केला होता या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर वारंवार अतिरेक्यांनी घुसखोरी करून भ्याड हल्ले केले. अलिकडेच दोन दिवसांपूर्वी नियंत्रण रेषेवर साना भाटा या गावावर अतिरेक्यांनी कब्जा केला होता. लष्करानं कारवाई सुरू केल्यानंतर अतिरेक्यांनी पळ काढला.

close