ठाण्यात सर्वपक्षीय नेते एकवटले, उपोषणाला बसले

October 5, 2013 1:41 PM0 commentsViews: 954

thane fasting05 ऑक्टोबर : ठाण्यात धोकादायक इमारतीविरोधात आणि पुर्नवसनासाठी क्लस्टर डिव्हेलपमेंटच्या मागणीसाठी सर्व पक्षीय नेते एकवटले आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

 

पहिल्यादिवशी मोठा गाजावाज करत आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसले. एकीकडे आव्हाडांचं उपोषण सुरू झालं तर दुसरीकडे मनसेनं परवानगी नसताना आंदोलन केलं आणि अटक झाल्यानंतर जामीन न घेता ठाणे सेंट्रल जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय.

 

तसंच खासदार संजीव नाईक, आनंद परांजपे यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. जो पर्यंत मुख्यमंत्री स्वत:घोषणा करत नाहीत तो पर्यंत आमचं उपोषण सुरूच राहणार असा पवित्रा या नेत्यांनी घेतलाय. रात्री या तिन्ही नेत्यांनी हातात टाळ घेऊन भजनही केलं. सरकारनं क्लस्टर डिव्हेलपमेंटला लवकर निर्णय घ्यावा यासाठी आम्ही भजनाद्वारे देवाला साकडं घालत असल्याचं सांगत या नेत्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.

 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत क्लस्टर डिव्हेलेपमेंट करणार असं अश्वासन दिलं होतं. पण तरीही काही नेते आंदोलन करून राजकीय वातावरण तापवतायत असं चित्र ठाण्यात बघायला मिळतंय.

close