पतंगराव कदमांची फटकेबाजी

October 5, 2013 6:41 PM0 commentsViews: 1859

05 ऑक्टोबर : अकलूज परिसराचा कायपालट करणारे दिवंगत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणार्‍या ‘गोल्डन टच’ या इंग्रजी पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पुण्यात चांगलाच रंगला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, सुनील तटकरे, दिलीप सोपल यांच्या राजकीय आतिषबाजीमुळे कार्यक्रम चांगलाच रंगला. पण या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार हे मात्र गैरहजर राहिले. या कार्यक्रमात खरी जान आणली ती पतंगराव कदम यांच्या बिनधास्त फटकेबाजीमुळे…पतंगराव म्हणतात, काँग्रेसमध्ये दिल्लीवरून हायकमांडचा फोन येण्यावर सगळ चालतं असं सांगत आता पूर्वीसारखे नेते राहिले नाहीत, चिल्लर- बुळबुळीत नेते उरलेत असं सांगत 4 मुख्यमंत्री कसे आले आणि कसे गेले ते आपण पाहिले. आपल्याला दरवेळी मुख्यमंत्री करू म्हणतात पण अजून केलं नाही हे खुसखुशीतपणे सांगत अजित पवारही पतंगराव तुम्ही मुख्यमंत्री व्हा असं म्हणत असतात पण आपण निष्ठावान शिस्तबद्ध कार्यकर्ता आहोत असं पृथ्वीराज बाबा समोरच सागत आपलं जे काय आहे ते उघडउघड समारोसमोर असतं असं सांगत एकच खुर्ची आहे ती किती जणांनी खेचायची असं सांगत धमाल उडवून दिली. शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमाला आले नाहीत त्याचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी कुणी येवो न येवो मी आलोय असं सांगत शिक्षण आणि नेतृत्त्व यांचा संबंध असतोच असं नाही हे राजकीय चातुर्य-शहाणपणानं वागून शंकरराव मोहिते पाटलांनी दाखवून दिलं असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

close