सभापतींचा घरी आढळला ‘शालेय पोषण आहार’

October 5, 2013 6:55 PM0 commentsViews: 158

05 ऑक्टोबर : लहान मुलांच्या पोषण आहारावर डल्ला मारण्याचा प्रकार परभणी पाठोपाठ आता रायगडमध्येही उघड झाला. रायगडमधल्या गोरेगावात शालेय पोषण आहाराचं धान्य पंचायत समिती सभापतींच्या घरी आढळून आलंय. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, शिपाई आणि टेम्पो ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परभणीत आमदाराच्या नातेवाईकानंच शालेय पोषण आहाराच्या धान्यावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली. खुल्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा शालेय पोषण आहारातील 650 पोती तांदूळ परभणी पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी प्रवीण ट्रेडर्सचे मालक सुशील जेथलिया आणि त्याचा साथीदार शेख रियाजसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. सुशील जेथलिया हे अपक्ष आमदार सुरेश जेथलिया यांचे पुतणे आहेत. त्यांच्याकडून 6 लाख रुपयांची रोकडसुद्धा जप्त करण्यात आलीये.

close