मुख्यमंत्र्यांनी घेतली खडसेंची भेट

October 5, 2013 7:15 PM0 commentsViews: 1522

khadse meet cm05 ऑक्टोबर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. चितळे समितीच्या मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय.

 

मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण माझी तब्येत बरी नसल्यानं माझ्या घरी बैठक झाली असं खडसेंनी स्पष्ट केलंय. सिंचन घोटाळ्याची चौकशी कमिशन ऑफ इनक्वारी ऍक्ट नुसार व्हावी अशी मागणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं कळतंय.

 

एमईआरसीनं सुचवलेली प्रस्तावित वीज दरवाढ रद्द व्हावी अशी मागणीही खडसेंनी केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

close