शिल्पा शेट्टीने घेतले राजस्थान रॉयल्सचे शेअर्स

February 3, 2009 4:11 AM0 commentsViews: 3

3 फेब्रुवारीइंडियन प्रिमिअर लीगचा दुसरा हंगामाची चर्चा आता क्रिकेट फॅन्समध्ये सुरु झालीय. आणखी एक बॉलिवुड तारका आयपीएलशी जोडली गेली आहे. बॉलिवुड स्टार शिल्पा शेट्टीने राजस्थान रॉयल्स टीमच्या जर्सीचे हक्क विकत घेतले आहेत.बॉलिवुडचा आयपीएलमधला सहभाग गेल्या वर्षी चर्चेचा विषय झाला होता. आणि त्यामुळे आयपीएलला ग्लॅमर मिळालं होतं. प्रीती झिंटा पंजाब किंग्ज इलेव्हन टीमची तर शाहरुख खान आणि जुही चावला कोलकाता नाईट रायडर्स टीमचे मालक आहेत. टीमच्या प्रत्येक मॅचच्या वेळी हे स्टार आपल्या टीमचा चिअर करायला मैदानावर असायचे. आता शिल्पा शेट्टीही कदाचित राजस्थान रॉयल्स टीमबरोबर दिसेल. ती आणि तिचा मित्र राज कुंदर यांनी टीमच्या जर्सीसाठी अकरा टक्के स्पान्सरपशिप घेतली आहे.

close