‘गोदापार्क’चं राज ठाकरेंनी केलं सादरीकरण

October 5, 2013 6:50 PM1 commentViews: 8717

05 ऑक्टोबर : नाशिकच्या गोदापार्कचा विकास रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने केला जाणार आहे. गोदापार्क प्रकल्पाच्या संदर्भात स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शनिवारी नाशिकमध्ये सादरीकरण केलं. गोदावरी नदीच्या किनार्‍यावर पाच किलोमीटर अंतरावर हे पार्क विकसित केलं जाणार आहे. त्याची रचना आज मांडण्यात आली. याच धर्तीवर पुण्यात मुळा मुठा आणि मुंबईत मिठी नदीच्या किनारी असंच पार्क विकसित करण्याचा आपला मानस असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. एखादा मोठा प्रकल्प राबवायचा असेल तर त्यासाठी भक्कम यंत्रणा लागते. या प्रकल्पासाठी अनेकांनी आपल्या जमिनी दिल्यात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या नाशिक शहराची सत्ता मनसेच्या हातात दिली. मनसेचा पहिला महापौर याचं शहराने दिला त्यामुळे आम्हाला या शहराला काही तरी देणं आहे आणि हा त्यातला पहिला प्रकल्प आहे असंही राज म्हणाले.

  • shyam more

    This is all rubbish.

close