तुळजाभवानी मंदिरात चेंगराचेंगरी,1 ठार

October 5, 2013 9:03 PM0 commentsViews: 447

05 ऑक्टोबर : तुळजापूरमध्ये नवरात्रौत्सवाला गालबोट लागलंय. तुळजाभवानी मंदिरात मध्यरात्री साडेबाराच्या सुमाराला चेंगराचेंगरी झाली. यात एकाच मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आलंय. मृताचं नाव हरिदास खपाले असं असून तो सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या दसूरचा रहिवाशी आहे. पश्चिम महाराष्ट्रातले नवरात्रौत्सव मंडळाचे कार्यकर्ते आजच्या मध्यरात्री दरवर्षी तुळजापुरात दाखल होतात, आणि तुळजाभवानाची मानाची ज्योत घेऊन आपल्या गावाकडं जाऊन देवीची स्थापना करतात. ही ज्योत घेण्यासाठी मध्यरात्री मंदिरात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. मंदिराचा दरवाजा अचानक उघडल्यानं कार्यकर्त्यांनी एकदाच घुसण्याचा प्रयत्न केला, त्यातून चेंगराचेंगरी होऊन हा अपघात झाला. घटनास्थळाला पालकमंत्री मधुकरराव चव्हाण आणि खासदार पद्मसिंह पाटील यांनी भेट दिली. या प्रकरणाची दंडाधिकार्‍यांमार्फत तीन महिन्यात चौकशी करा असा आदेश पालकमंत्र्यांनी दिलाय.

close