लग्नाचा हट्ट केला म्हणून तरुणीने केला अभियंत्याचा खून

October 5, 2013 6:47 PM0 commentsViews: 2484

05 ऑक्टोबर : नागपूरच्या नंदनवन परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता सुधीर करडमाडे यांच्या हत्येचं गुढ अखेर उलगडलंय. या हत्येप्रकरणी एका 19 वर्षीय तरूणीला पोलिसांनी अटक केलीय. प्रणाली भोयर असं या तरूणीचं नाव आहे. ही तरूणी डीएडचं शिक्षण घेत असून तिने हत्येची कबुली दिलीय. आपली करडमाडेंशी एसटी बसमध्ये भेट झाली होती. ते आपल्याला शिकवण्यासाठी आपल्या घरी बोलवायचे पण त्यांनी आपल्यामागे लग्नाचा हट्ट लावल्याने आपण ही निर्घुण हत्या केली अशी कबुली प्रणालीनं दिलीय.
2 ऑक्टोबर रोजी निवृत्त अभियंता सुधीर करडमाडे यांची भरदिवसा राहत्या घरी निर्घृण हत्या झाली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी करडमाडेंच्या मृतदेहाशेजारी रक्ताच्या थारोळ्यात पायाचे ठसे आणि महिलेचे केस मिळाले होते. शेजार्‍यांकडे चौकशी केली असता घटनेच्या काही दिवसांपासून एक तरूणी स्कार्फ बांधून करमाडेंच्या घरी येत होती. पोलिसांनी ही तरूणी कोण असावा याचा तपास सुरू केला अखेरीस आज ही तरुणी पोलिसांच्या ताब्यात आली. पोलिसांनी जेव्हा या तरुणीला खून का केला असा सवाल केला असता तिने जे काही सांगितलं ते एकूण पोलीस स्तब्ध झाले. करडमाडे हे आपल्याकडे लग्नाची मागणी करायचे. त्यांनी लग्नाचा हट्ट लावून धरला होता पण ते विवाहित होते हे कळल्यावर आरोपी तरूणींनी 2 ऑक्टोबर रोजी दिवसाढवळ्या राहत्या घरात धारधार चाकूने करडमाडेंचा खून केला अशी कबुली तरूणीने दिली.

close