निवडणूक आयोगानं बोलावली सर्वपक्षीय बैठक

February 3, 2009 10:50 AM0 commentsViews: 1

3 फेब्रुवारी, दिल्लीनिवडणूक आयोगांतर्गत सुरू असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं आता लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. देशातले सात प्रमुख राष्ट्रीय पक्ष आणि 40 प्रादेशिक पक्षांची आज बैठक बोलावण्यात आली आहे. सहा फेब्रुवारीपर्यंत अशा बैठका होणार आहेत. दरम्यान सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांनी राजकारण करू नयेअशा शब्दात केंद्रीय कायदामंत्र्यांनी खडसावलं आहे. तसंच सेवाज्येष्ठतेप्रमाणे नवीन चावला हेच नवे निवडणूक आयुक्त होतील असा दावाही कायदामंत्री हंसराज भारद्वाज यांनी केला आहे.

close