आंध्रावर वीजेचं संकट, 50 हजार कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा

October 7, 2013 1:32 PM0 commentsViews: 445

telangana issue3307 ऑक्टोबर : आंध्र प्रदेशात तेलंगणाविरोधी निदर्शनांमुळे वीजेचं संकट ओढवण्याचा धोका निर्माण झालाय. राज्यातल्या 50 हजार कर्मचार्‍यांनी निदर्शनांमध्ये सहभागी होण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे वीजेचं संकट ओढवू शकतं. मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी कर्मचार्‍यांना संपावर न जाण्याचं आवाहन केलंय.

 

दुसरीकडे, निदर्शनांमुळे राज्यातली रेल्वे सेवा विस्कळीत झालीये. तर वीजेचं संकट ओढवल्यास रेल्वेसेवा आणखी विस्कळीत होऊ नये यासाठी उपाय योजत असल्याचं रेल्वे खात्यातर्फे सांगण्यात आलं. दरम्यान, विजयनगरमध्ये संचारबंदी कायम असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेशही कायम आहेत.

 

सीमांध्रच्या मुद्यावर आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय मंत्री पुरंदेश्वरी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. त्यांच्यापाठोपाठ मंत्री श्रीनिवास यांच्या घरावरही घेराव घालण्यात आला. वीजेचं संकट ओढावू नये यासाठी आंदोलनकर्ते आणि सरकारी कर्मचारी संघटनेची सरकारच्या समितीशी बैठक पार पडली पण ही बैठक निष्फळ ठरलीयं. त्यामुळे तेलंगणाविरोधी आंदोलन अधिक तीव्र झालाय.

 
चंद्राबाबू नायडूचं दिल्लीत उपोषण
दरम्यान, स्वंतत्र तेलंगणाच्या विरोधात तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हे आजपासून उपोषणाला बसलेत. काँग्रेसनं राजकीय फायद्यासाठी तेलंगणाचा निर्णय घेतल्याचा आरोप चंद्राबाबूंनी केला. तसंच काँग्रेसनं वायएसआर काँग्रेसशी हातमिळवणी केल्याची टीकाही त्यांनी केली. चंद्राबाबू दिल्लीत उपोषण करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी हैदराबादमध्ये एनटीआर घाटावर जाऊन आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे संस्थापक एनटी रामाराव यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

close