विद्यार्थ्यांसाठी बुरशी लागलेल्या धान्याचं जेवण !

October 7, 2013 1:47 PM0 commentsViews: 343

dhanu schoolविजय राऊत, डहाणू
07 ऑक्टोबर : रस्त्यावर भरणारे वर्ग…बुरशी लागलेलं धान्य…उंदरांनी कुरतलेल्या पीठाच्या गोण्या…त्याचंच जेवण…हे भीषण चित्र आहे, ठाणे जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्याच्या उपलाट या शासकीय आश्रमशाळेचं..

 

या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत 472 विद्यार्थी शकतायेत. पण त्यांच्यासाठी खोल्या आहेत फक्त चारच. मुलांना झोपण्यासाठी वेगळी जागा नाहीये. तर वर्गातच त्यांना झोपावं लागतं.

 

इतकंच काय पण विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शासनानं दिलेल्या टॉनिकच्या बाटल्याही त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्या अक्षरश: फेकून देण्यात आल्यात.

 
शाळेची, विद्यार्थ्यांची अशी अवस्था असताना मुख्याध्यापक मात्र इकडे फिरकलेलेच नाहीत. शाळेला एकूण 4 एकराची जागा आहे. निधीही उपलब्ध आहे. पण अंमलबजावणी ची साधी तसदीही कुणी घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मात्र खेळ होतोय.

close