श्रीनिवासन IPLपासून दूर राहिले तरच अध्यक्षपद द्या :सुप्रीम कोर्ट

October 7, 2013 1:15 PM0 commentsViews: 203

sc on shrinivasan07 ऑक्टोबर : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरुन वादात सापडलेले बीसीसीआयचे अध्यक्ष यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिलाय.  जोपर्यंत श्रीनिवासन आयपीएलपासून स्वत:ला दूर ठेवत नाहीत तोपर्यंत त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कारभार बघता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

 

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात यावी असंही सुप्रीम कोर्टाने सुचवलंय. मुकुल मुग्दल यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत सीनिअर ऍडव्होकेट नागेश्‍वर राव आणि आसाम क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष निलेश दत्त यांची नावं सुचवण्यात आली आहेत.

 

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात जावयाचं नाव आल्यामुळे अडचणीत आलेल्या श्रीनिवासन यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद स्वीकारावं किंवा नाही याबद्दल वाद निर्माण झाला होता.त्यावर सुप्रीम कोर्टाने आज एका याचिकेवर निर्णय दिला.

close