केरनमध्ये लष्कर-अतिरेक्यांमध्ये चकमक सुरूच

October 7, 2013 1:17 AM0 commentsViews: 159

jammu kashmir07 ऑक्टोबर : जम्मू काश्मीरमधल्या केरनमध्ये आज सलग 14 व्या दिवशीही लष्कर आणि अतिरेक्यांमधली चकमक सुरूच आहे. या परिसरातल्या सर्व नागरिकांना इथून हटवण्यात आलंय.

 

शाला बाटू गावामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाल्याचं लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितलंय. यापूर्वी शाला बाटूच्या जवळ गुज्जर -दूर इथं चार दहशतवाद्यांना घुसखोरीचा प्रयत्न करत असताना ठार करण्यात आलंय.

 

तर शाला बाटूपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेह गली इथंसुद्धा घुसखोरीचा प्रयत्न झालाय. पाकिस्तानी लष्करानं 30 ते 40 दहशतवादी भारतात घुसवले असल्याचा सैन्याचा आरोप आहे. पाकिस्ताननं मात्र हे आरोप फेटाळले आहे.

close