महेश एलकुंचवार यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

October 7, 2013 1:02 PM0 commentsViews: 125

Image img_129272_mahesh-elkunchwar34_240x180.jpg07 ऑक्टोबर : नाट्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार यंदा जेष्ठ नाटककार आणि साहित्यिक महेश एलकुंचवार यांना जाहीर करण्यात आलाय. येत्या 5 नोव्हेंबर रोजी सांगलीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

 

महेश एलकुंचवार यांचा लेखक म्हणून वाडाचिरेबंदी त्रिनाट्यधारा प्रयोग हा जागतिक रंगभूमीवर वाखाणल्या गेला. त्यामुळेच प्रायोगिक रंगभूमीवर एलंकुचवारांचं नाव मोठ्या आदाराने घेतलं जातं.

 

एलकुंचवारांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरील 21 नाटकांचं लिखान केलंय. त्यामध्ये रुद्रवर्षा, सुलतान, झुंबर, एका म्हातार्‍याचा खून, कैफियत, एक ओसाड गाव, यातनाघर, गारबो, वासनाकांड इत्यादी नाटकं आहेत. शिवाय एलकुंचवारांना पटकथा संवादकार आणि एक उत्तम कलावंत म्हणून ओळखलं जातं.

close