‘तिसरी आघाडी जिंकेल’

October 7, 2013 3:34 PM0 commentsViews: 222

07 ऑक्टोबर : 2014च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा तिसर्‍या आघाडीची चर्चा सुरू झालीये. पुढची निवडणूक काँग्रेस किंवा भाजप नाही, तर तिसरी आघाडी जिंकेल असा विश्वास समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी व्यक्त केलाय. डाव्या पक्षांसोबत त्यासाठी चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. काहीच दिवसांपूर्वी सीपीएमचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी मुलायम यांची भेट घेतली होती.

close