दारुडा पोलीस व्हॅन चालक निलंबित

October 7, 2013 3:53 PM0 commentsViews: 716

07 ऑक्टोबर : कोल्हापूरमध्ये दारू पिऊन धुडगूस घालणार्‍या पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस व्हॅनचालक चंद्रकांत कामत याला निलंबित करण्यात आलं असून त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर इतर 5 पोलिसांच्या रक्ताचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहे.रविवारी रात्री शहरातल्या वाशी नाका परिसरात गस्त घालणारे पोलीस गाडीतच मद्यपान करत असल्याचं काही नागरिकांच्या लक्षात आलं. त्यानंतर नागरिकांनी त्यांना हटकलेही मात्र ते पोलीस…त्यांनीच नागरिकांना मोठ्या आवाजानं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अखेर मद्यपानाचा कार्यक्रम झाल्यानंतर बेधूंद पोलीस व्हॅन पुन्हा शहराकडे येत असतानाच राजकपूरांच्या पुतळ्याजवळ ही गाडी एका विजेच्या खांबाला धडकली. त्यामध्ये विजेचा खांब वाकला गेला आणि पोलीस गाडी एका घराच्या भिंतीला जाऊन धडकली. या प्रकरणी सहा पोलिसांना अटक करण्यात आली होती.

close