नारायण साईविरोधात लुकआऊट नोटीस

October 7, 2013 4:49 PM0 commentsViews: 867

sai naryan07 ऑक्टोबर : लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरूंगात हवा खाणार्‍या आसाराम बापूच्या कुटुंबीयाभोवती कायदाचा फास आवळत चाललाय. आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याच्याविरोधात सुरत पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावली आहे.

 

साईसोबत त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती यांच्याविरोधातही लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. साई आपल्या कुटुंबीयासोबत देशबाहेर पळून जाण्याचा संशय पोलिसांना आल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली.

 

त्यामुळे साई नारायण कोणत्याही विमानतळ,बंदरावर आढळून आल्यास तिथल्या तिथेच अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 

रविवारी सुरतमध्ये दोन सख्या बहिणींनी साईविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली. आसाराम बापू आणि साईवर बलात्कार, लैगिंक अत्याचार, डांबून ठेवणे असे आरोप करण्यात आले आहे.

close