दिल्लीत इंडियन ऑफ द इयर पुरस्कारांचं वितरण

February 3, 2009 11:02 AM0 commentsViews: 3

3 फेब्रुवारी, नवी दिल्लीसीएनसीएनएन आयबीएन च्या इंडियन ऑफ द इयर पुरस्कारांचं वितरण झालं. भारताच्या चांद्रयान मोहिमेचं नेतृत्व करणारे माधवन नायर आणि त्यांची टीम ' इंडियन ऑफ द इयर ' ठरले. तर याच सोहळ्यात मुंबई हल्ल्यातील शहिदांचा गौरव करण्यात आला. यावेळी कसाबला जिवंत पकडणार्‍या शहीद तुकारम ओंबळे, शशांक शिंदे, सदानंद दाते आणि संजय गोविलकर यांचा विशेष सेवा पुरस्कारानं भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या वतीनं पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांची मुलगी वैशाली ओंबळे आली होती. " माझ्या बाबांमुळे कसाबसारखा अतिरेकी पकडला गेला. माझ्या बाबांचा मला अभिमान आहे, असं वैशाली ओंबळे पुरस्कार घेताना कृत्यकृत्य होत म्हणाली. " मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईचं रक्षण करण्यासाठी आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारीही रणांगणावर उतरले होते. त्यांच्यामुळे आम्ही कसाबला पकडू शकलो, " असं संजय गोविलकर म्हणाले.

close