‘अजित पवार हे महाराष्ट्राचे लालूप्रसाद यादव’

October 7, 2013 7:32 PM0 commentsViews: 2361

07 ऑक्टोबर : सिंचनात अजित पवारांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केला असून हे महाराष्ट्राचे लालूप्रसाद यादव आहेत आणि त्यांची जागा जेलमध्येच आहे आणि ती जागा भाजप अजित पवारांना दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी जहरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली. पक्षाचे लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडे यांनीही अजित यांच्यावर टीका केली. आपण सत्तेत आलो तर अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी स्वत: करू आणि अजित पवारांना अटक केल्यानंतर त्यांना येरवडा जेलमध्ये की हर्सुल जेलमध्ये टाकायचं हे जनतेनं सांगावं असा सवालही मुंडेंनी केला. शेतकर्‍यांसाठी काढलेल्या पदयात्रेच्या औरंगाबादमध्ये समारोप झाला यावेळी झालेल्या सभेत हे दोनही नेते बोलत होते.

close