दहा वर्षांपासूनचं स्वप्न,’कर लो गोदापार्क मुठ्ठी में !’

October 7, 2013 7:20 PM3 commentsViews: 2991

दीप्ती राऊत, नाशिक
07 ऑक्टोबर : नाशिकमध्ये साकारणार्‍या गोदापार्क प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आलं. रिलायन्स फाउंडेशनच्या वतीनं हा गोदापार्क साकारण्यात येणार आहे. अर्थात गोदापार्क हा प्रोजेक्ट नाशिककरांसाठी नवीन नाही. यावेळी नवीन आहे ते रिलायन्स फाउंडेशन…

 
राज ठाकरे म्हणतात, “हा प्रोजेक्ट मोठा आहे, तो मला मनपातर्फे सॅक्शन वैगरे तसा करायचा नाही..हा प्रोजेक्ट वेगळा आहे. हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे. हा नाशिककरांचा प्रोजेक्ट आहे. एक उदाहरण मला उभं करायचंय महाराष्ट्रात…”

 
हे शब्द नाशिककरांसाठी नवीन नाहीत. 2002 पासून नाशिककर हे शब्द ऐकत आहेत. एक दोन नाही, तब्बल गेल्या 10 वर्षांपासून गोदापार्कच्या या स्वप्नरंजनावर राज ठाकरेंचं नाशिकमधलं राजकारण सुरु आहे. कित्येक आयुक्त आले, गेले, महापौर आले, गेले पण गोदापार्क काही झालं नाही. मध्यंतरी लतादीदींच्या खासदार निधीतून 1 कोटी मिळणार होते. ते पत्रही गोदावरीच्या पाण्यात वाहून गेलं. पण यावेळी पक्ष बदललाय आणि पार्टनरही. यावेळचा प्रोजेक्ट जास्त कल्पक आहे आणि तेवढाच महत्त्वाकांक्षीही.

 
गोदाकिनार्‍यावरचा 5 किलोमीटरचा पट्टा या पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी रिलायन्स फाउंडेशन 50 कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे. नाशिककर याचं स्वागत करत आहेत, पण त्यांची एक लहानशी अपेक्षा आहे. जुन्या प्रोजेक्टचा रंग उडून गेलाय, अक्षरं गायब झालीत. या नवीन प्रोजेक्टचं सादरीकरण तर राजसाहेबांच्या नेहमीच्या दिमाखात आणि कल्पकपणे करण्यात आलं. पण मूळ मुद्दा आहे तो अंमलबजावणीचा..

 • pravin

  raj thakre yanchi vatchal hi narendra modinchya dishene disat aahe …..hats off to raj

 • vineet

  Veenit

  in next election will be like RAJ saheb VS (CON,RCON,BJP,SHIV SENA)

  Winner only—-RAJ Thakre

 • vineet

  election will be like RAJ saheb VS (CON,RCON,BJP,SHIV SENA)

  Winner only—-RAJ Thakre

close