मेडिकल नोबेल पारितोषिक जाहीर

October 7, 2013 9:59 PM0 commentsViews: 124

nobel07 ऑक्टोबर : मेडिकल क्षेत्रातलं नोबेल पारितोषिक जेम्स रॉथमन, रैंडी शेकमन आणि थॉमस सुडॉफ यांना विभागून देण्यात आलंय. स्वीडनमधल्या स्टॉकहोम शहरात ही घोषणा करण्यात आली.

 

रक्तामध्ये इंसुलिन कशाप्रकारे सोडलं जातं. नर्व्ह सेल्समधली संदेशवहन प्रक्रिया आणि व्हायरस पेशांवर कसा हल्ला करतात. या सगळ्यावर त्यांनी संशोधन केलंय.

 

हे तिघंही शास्त्रज्ञ अमेरिकेतल्या विविध विद्यापीठांमध्ये काम करतात. यामधले रॉथमन आणि शेकमन हे जर्मनीचे नागरिक आहेत तर सुडॉफ हे अमेरिकेचे नागरिक आहेत.

close