डोंबिवलीकरांसाठी सरकते जीने

October 7, 2013 10:09 PM0 commentsViews: 463

07 ऑक्टोबर :ठाणे रेल्वे स्थानकापाठोपाठ डोंबिवली रेल्वे स्थानकातही सरकता जीना सुरू झालाय. प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर असलेल्या या जीन्यावरून एक तासात जवळजवळ 9000 लोक वापर करू शकतात. यासाठी एकूण 75 लाख रुपये खर्च करण्यात आलेत. 17 ऑक्टोबर रोजी कल्याण स्थानकातही एस्केलेटरचं भूमीपूजन होणार आहे. त्यानंतर कुर्ला आणि दादर स्थानकात सरकते जीने सुरू करण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे.

close