लीमन ब्रदर्सची स्थिती सुधारतेय

February 3, 2009 12:14 PM0 commentsViews: 1

3 फेब्रुवारी, मुंबई दिवाळखोरीत निघालेल्या लीमन ब्रदर्सची स्थिती सुधारत असल्याची बातमी वॉल स्ट्रिट जर्नलच्या सूत्रांनी दिलीये. वॉल स्ट्रिट जर्नलसाठी लीमन ब्रदर्स होल्डिंग्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह ब्रायन मार्शल यांनी मुलाखत दिलीय. त्यातील माहितीप्रमाणे कंपनीनं दोनशे कर्मचार्‍यांनी कामावर परत घेतलंय आणि नवीन भरतीही सुरू केलीय. कंपनीकडे सध्या सात अब्ज डॉलर्सची संपत्ती बाकी आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांचे पगार पूर्वीइतके नसले तरी पुरेसे असल्याचं मार्शल यांनी म्हटलंय. तसंच सुमारे बारा अब्ज डॉलर्स किंमतीची खाजगी गुंतवणूकदेखील आहे. कंपनीच्या बुडीत खात्यांचा हिशोब मांडण्यासाठी न्यूयॉर्कच्या अल्वारेज अँड मार्शलनं लीमनच्याच 130 कर्मचार्‍यांना पेरोलवर ठेवलंय.

close