हे खावं, हे खाऊ नये !

October 7, 2013 10:18 PM1 commentViews: 111

07 ऑक्टोबर : सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्याकडून जर कुठली महत्वाची गोष्ट राहून जात असेल तर ती म्हणजे आपल्या आरोग्याची देखभाल. विशेषत: महिलांच्या आरोग्याकडे तर सर्रास दुर्लक्षच होतंय. नवरात्रानिमित्त आम्ही करतोय महिलांच्या आरोग्याचा जागर…

स्वाती कदम सांगते, ‘दिवसाची सुरूवात सकाळी सव्वा सहा – साडे सहाला होते. मलाही माहीत आहे सकाळी नास्त्याची अत्यंत गरज असते पण अशा धावपळीत तेवढ नाही करू शकत’

स्वाती प्रमाणेच नोकरी करणार्‍या बहुतेक महिलांची हीच कहाणी असते. एकदा का कामावर गेलं की दिवसभर काही उसंत नसते, यामुळे खाण्या-पिण्याच्या वेळा सुटतात अशावेळा आपण चहा,बिस्किटं, वेफर खाणं हा शॉर्टकट वापरतो. पण हेच शॉर्टकर्ट्स गंभीर आजार होऊ शकतात.

हे खाणं टाळा

 • - उपाशी पोटी तेलकट / तिखट
 • - पाव, मैद्याची बिस्किटं

नेहमी सोबत ठेवा

 • - केळी
 • - भाजलेले शेंगदाणे
 • - उकडलेली कडधान्य

हे खावं

 • 1 – फळं – केळ,चिकू,सफरचंद,खजूर, ड्राय फ्रूट्स,ज्युस
 • 2 – दर तीन तासांनी थोडं खा
 • 3 – शाकाहार-मांसाहार मिश्रण हवे
 • 4 – पाणी भरपूर प्या
 • 5 – उपवास फळं-ज्युसने सोडा

करू नये

 • 1 – चहा-कॉफी कमी घ्यावी
 • 2 – चहा-कॉफी ऐवजी लिंबूपाणी घ्यावं
 • 3 – फास्ट फूड जंक फूड टाळावं
 • 4 – रात्री उशिरा जास्त जेउ नये
 • 5 – उपाशीपोटी तेलकट-तिखट खाऊ नये

 

 • Shital Savekar

  maz sagala barobar ulata challay

close