मलालावर पुन्हा हल्ला करु, तालिबान्यांची धमकी

October 7, 2013 10:36 PM0 commentsViews: 884

malala07 ऑक्टोबर : संधी मिळाली तर मलाला युसुफझाईवर पुन्हा हल्ला करू, अशी धमकी पाकिस्तानी तालिबाननं दिली आहे. 2 दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये ही धमकी देण्यात आलीय. हा व्हिडिओ कुठून पाठवण्यात आला याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

 

मलालावर यापूर्वीही एकदा हल्ला झाला होता. त्यावेळी तिचं वय होतं फक्त 15 वर्षं. पण देव बलवंत होत म्हणून या हल्ल्यात ती बालबाच बचावली. तिच्यावर जीवाला धोका लक्षात घेत तिच्यावर लंडन इथं उपचार घेण्यात आले. उपचारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ती लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

 

लंडन सरकारनेही तिला पूर्ण संरक्षण देण्याचं शाश्वती दिली. अलीकडेच मलालाचा 16 वा वाढदिवस झाला. तिचा वाढदिवस हा मलाला दिवस म्हणून संयुक्त राष्ट्राने जाहीर केलाय. तालिबानमध्ये मुलींना शिक्षण मिळावं यासाठी तिने तालिबान्यांविरोधात लढा पुकारला होता. 16 वर्षांच्या या मलालाने असाध्य अशी कामगिरी करून दाखवली तिच्या या साहसाचं जगभरातून कौतुक होत आहे मात्र तालिबान्यांना ही गोष्ट खटकत चाललीय म्हणून त्यांनी संधी मिळेल तेंव्हा तिच्या पुन्हा हल्ल्याची धमकी दिलीय.

close