आठवलेंची राजनाथ सिंहांकडे राज्यसभेच्या जागेची मागणी

October 8, 2013 5:21 PM0 commentsViews: 819

athavale meet rajanat08 ऑक्टोबर : जागा वाटपावरुन नाराज असलेले आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज मंगळवारी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आपल्याला राज्यसभेची जागा मिळावी अशी मागणी आठवलेंनी केल्याचं कळतंय.

 

तर यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं आश्वासन राजनाथ सिंह यांनी आठवलेंना दिलंय. एनडीएमध्ये अधिकृत सदस्यपक्ष म्हणून आपल्याला मान्यता द्या आणि एनडीएच्या बैठकीचं आम्हालाही निमंत्रण द्या अशी मागणीही आठवलेंनी केलीये.

 

येत्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्येही जागांची मागणी त्यांनी भाजपकडे केलीये. यावर पक्ष बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ असं राजनाथ सिंहांनी आठवलेंना आश्वासन दिलंय. राज्याच्या भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलं यासाठी राजनाथ सिंह आज मुंबईत आहेत. यावेळी आठवलेंनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

close