रत्नागिरीतल्या विद्रोही साहित्यसंमेलनात रंगले परिसंवाद

February 3, 2009 12:18 PM0 commentsViews: 9

3 फेब्रुवारी, रत्नागिरीदिनेश केळुसकर विद्रोही चळवळीनं जास्तीतजास्त परिवर्तनवादी विचारांचे प्रवाह आपल्याशी जोडून घेण्याची गरज आहे, असं मत कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कानगो यांनी व्यक्त केलीये. दोन दिवस चाललेल्या दहाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कणकवलीत झाला. यावेळी विद्रोही साहित्य व्यासपीठावर वाढत चाललेल्या राजकीय वावराबद्दलही चर्चा झाली.कणकवलीतल्या विद्रोही साहित्य संमेलनात अनेक विषयांवर परिसंवाद झाले. विद्रोही विचारमंचावर वाढत चाललेला राजकीय हस्तक्षेप थांबवण्याची मागणी दत्ता सराफ यांनी केली. तर संमेलनाध्यक्ष संजय पवार यांनी यात काही गैर नसल्याचं मत मांडलं. मंचावर काही राजकीय कार्यकर्त्यांचा वावर जास्त असतो अशी आपल्या काही मित्रांची रास्त टीका आहे. पण साहित्य, कला आणि संस्कृतिच्या अंगानं हे संमेलन पुढच्या काळात कसं जाईल याच्याबद्दल अजून विचार करण्याची गरज आहे, " असं विद्रोही चळवळीचे जनरल सेक्रेटरी दत्ता बाळसराफ म्हणाले. " मला उलटं असं वाटतं की काही वेळा भूमिका स्पष्ट होण्यासाठी, अनेक प्रश्न समजण्यासाठी अशा भूमिका असणा-या सर्व गटातटांची किंवा जे पक्ष आहेत त्यांची मदतच होते,"असं मत दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केलं. कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी या चळवळीला काही सूचना केल्या. " याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विचारांची की म्यूल्यनिर्मिती समाजामध्ये करण्याचं एक महत्त्व पूर्ण स्थान हे मला वाटतं सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळ आहे आणि हे काम या व्यासपीठावरून झालं पाहिजे," असं कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कांगो यांचं पडलं. विद्रोही चळवळीचा यापुढं एक कॉमन मिनिमम प्रोग्रामही तयार करून तो अंमलात आणण्याची गरज असल्याचा सूर या संमेलनात निघाला.

close