ओबामांकडून उसगावच्या मुलींनी उचलली मानवतावादाची प्रेरणा

February 3, 2009 1:33 PM0 commentsViews: 2

3 फेब्रुवारी, मुंबईज्ञानदा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आता एक व्यक्ती नाही तर विचार झालेत. ठाणे जिल्ह्यातल्या कातकरी विद्यार्थ्यांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेतलीय. उसगावच्या शाळेत ओबामा आणि अमेरिकेतली चळवळ पोहोचण्याचं कारण म्हणजे कॅथी श्रीधर. भारत आणि अमेरिका या दोन देशांना जोडणारा एक मानवतावादी संबंधचं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या उसगावमधल्या एकलव्य परिवर्तन विद्यालय नावाची शाळा आहे. जेव्हा बराक ओबामा निवडून आले तेव्हा या शाळेतल्या चिमुरड्यांना विलक्षण आनंद झाला होता. अमेरिकेतल्या मानवी हक्क चळवळीतल्या कॅथी श्रीधर यांनी ही शाळा सुरू करायला मदत केलीये. त्या गेली 25 वर्षं उसगावमध्ये येतायत. " कॅथी गेली 25 वर्षं इथं येतेय. तिच्यामुळेच आमच्या शाळेला निधी मिळवून दिला आहे, " असं संपर्कचे संस्थापक विवेक पंडित कृतज्ञता पूर्वक म्हणाले. कॅथी यांनी फक्त शाळेलाच निधी मिळवून दिला नाही तर मानवतावादी विचारही दिला. जो उसगावच्या कातकरी मुलींनीही आपलासा केलाय. " परिवर्तन विद्यालयातल्या मुली उद्याच्या नेत्या आहेत," हे कॅथी श्रीधर यांचे आत्मविश्वासपूर्वक उद्गार खूप काही सांगून जातात. ओबामांच्या मानवी हक्काचा विचार जगभर आपली मूळं पसरवतोय. नेमकं तेच उसगावच्या मुलींनाही अमेरिकेकडून काय घ्यायचं ते नीट समजलंय.

close