पुण्यात प्रवासी भाडेवाढ रद्द करण्याकडे दुर्लक्ष

February 3, 2009 3:32 PM0 commentsViews:

3 फेब्रुवारी, पुणे प्रवासी वाहतूक करणार्‍यांना भाडे कपात करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. पुण्यातली रिक्षा आणि शहर बस सेवा म्हणजेच पीएमपीएमएलनं केलेली भाडेवाढ रद्द व्हावी, अशी सूचना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं केली होती. पण रिक्षा संघटना आणि पीएमपीनं अजूनही भाडं कमी केलेलं नाही. रिक्षा संघटनांनी याला विरोध केलाय. तर पीएमपीएमएलच्या संचालक मंडळानं अजून याबाबत निर्णय घेतलेला नाहीये. या दोघांसोबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं गुरुवारी बैठक बोलावलीय. यात भाडे कपातीबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय होणारेय. मिळालेल्या माहितीनुसार पीएमपीएमएल भाडे कपातीस तयार आहे. पण रिक्षा संघटना नागरिकांच्या मागणीला कितपत प्रतिसाद देतात हे या बैठकीनंतरच स्पष्ट होणारेय.

close