तंदूरमध्ये पत्नीला जाळणार्‍या सुशील शर्माला मरेपर्यंत जन्मठेप

October 8, 2013 10:19 PM0 commentsViews: 1155

sushil sharam08 ऑक्टोबर : देशभर गाजलेल्या नैना सहानी तंदूर हत्याकांडाप्रकरणी आरोपी सुशील शर्माला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टाने सुनावली आहे. 2 जुलै 1995 ला सुशीलनं आपली पत्नी नैना सहानीची गोळी घालून हत्या केली होती.

 

नैना आणि तिचा वर्गमित्र महबूब करीम यांच्या मैत्रीवर संशयातून हा प्रकार केल्याचं समोर आलं होतं. हत्या केल्यानंतर सुशीलनं नैनाचा मृतदेह दिल्लीतल्या बगीया रेस्टॉरन्टमध्ये नेला होता. अगोदर त्याने नैनाच्या शरीराचे तुकडे केले. हे कृत्य एवढ्यावरच थांबल नाही.

 

तर सुशीलने नैनाचे तुकडे केलेला मृतदेह तंदूरच्या भट्टीत टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या परिसरात घाण वास येत असल्याचं एका पोलीस कॉन्स्टेबल ला समजल्यावर तपास केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी केशव कुमार याला अटक करण्यात आली. सुशील फरार झाला.

 

10 जुलै ला सुशील पोलिसांसमोर हजर झाला. त्यानंतर नैनाचं दुसर्‍यांदा पोस्टमार्टम करण्यात आलं त्यात तिच्या डोक्यात आणि मानेत गोळी मारून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी 7 नोव्हेंबर 2003 ला न्यायालयानं सुशील शर्माला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. पण त्यानं या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यायाचिकेवर कोर्टाने फाशीऐवजी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

close