RPI महायुतीत नसावी अशी काही सेना नेत्यांची इच्छा -आठवले

October 9, 2013 3:59 PM0 commentsViews: 1268

athavale on yuti10 ऑक्टोबर : आरपीआय महायुतीतून बाहेर पडण्याची काही शिवसेना नेत्यांची इच्छा असल्यास ही गंभीर बाब आहे. अशी इच्छा असणार्‍या नेत्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी अशी मागणी आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलीय.

 

आयबीएन लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना आठवले यांनी ही मागणी केलीयं. महायुती व्हावी ही बाळासाहेबांची इच्छा होती, त्यामुळे अशी इच्छा असणार्‍या नेत्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही अशा कडक शब्दात आठवलेंनी शिवसेना नेत्यांना फटकारलंय.

 

तसंच महायुतीतून बाहेर पडण्याची आमची इच्छा नाही. मात्र, सन्मानानं महायुती न झाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा इशाराही आठवले यांनी दिलाय.

close