स्त्री अर्भकाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

October 9, 2013 2:24 PM0 commentsViews: 270

abad story 409 ऑक्टोबर : औरंगाबादजवळ असलेल्या वाळूज औद्योगिक वसाहतीत मंगळवारी एका महिन्याच्या नवजात स्त्री अर्भकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतला मृतदेह सापडलाय.

 

सोमवारी या बाळाचं अपहरण झालं होतं. आणि दुसर्‍या दिवशी या बाळाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्यानं एकच खळबळ उडालीये. अशाच प्रकारची घटना एका महिन्यापूर्वीही घडली होती. तेव्हा 10 दिवसांच्या नवजात स्त्री अर्भकाचं अपहरण झालं होतं.

 

तेही अर्भक दुसर्‍या दिवशी विहिरीत मृत अवस्थेत सापडलं. विशेष म्हणजे ज्या मातापित्यांची ही दोन्ही स्त्री अर्भकं होती त्यांना आधीही मुलीच आहेत. पोलिसांनी दोन्ही प्रकरणात गुन्हे नोंदवले असून तपास सुरु आहे.

close