राहुल गांधींनी डागली यूपी सरकारवर तोफ

October 9, 2013 5:07 PM0 commentsViews: 468

rahul gandhi409 ऑक्टोबर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेश दौर्‍यावर असून त्यांनी आज अलिगढमध्ये झालेल्या सभेत यूपी सरकारवर एकच हल्लाबोल केला. या सरकारने तुम्हाला लॅपटॉप दिले, कॉम्प्युटर दिले पण त्यामुळे तुमच्या भागात रस्ते बनले का?, कोणता विकास झाला का? यूपी सरकार हे कॉम्प्युटरवर चालणारे सरकार असून जातीधर्माच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेशाची प्रगती खंडीत झालीय अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

 

तसंच त्यांनी दोषी लोकप्रतिनिधींसंबंधी वटहुकुमावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही त्यांनी खुलासा केला. मी ज्या पद्धतीने वटहुकुमाला विरोध केला ती पद्धती योग्य नव्हती पण सत्य सांगण्यासाठी कोणत्याही वेळीची वाट पाहावी लागत नाही. सत्य कधीही सांगता येतं अशी भूमिका राहुल यांनी मांडली.

 

तसंच त्यांनी अन्नसुरक्षा विधेयकाचं कौतुक करत सरकारने जनतेला स्वस्तात अन्न देण्याची योजना लागू केली ही देशातील जनतेला खूप मोठं देणं आहे असंही राहुल म्हणाले. तसंच मुझफ्फरनगरमध्ये रहिवाशांना दंगल, मारामारी, वाद नकोय पण काही राजकीय पक्षांनी स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांच्यात भांडणं लावून दिली असा आरोपही राहुल यांनी केला.

 

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उत्तर प्रदेश दौर्‍याचा आज दुसरा दिवस आहे. आज त्यांच्या अलिगढ आणि रामपूरमध्ये सभा होत आहेत. अलिगढ इथं सभा पार पडली यावेळी राहुल यांनी विद्यमान राज्य सरकार, समाजवादी पक्ष आणि मायावतींवर जोरदार टीका केली.

close