क्रेडिट कार्डांच्या व्याजदरांच्या मर्यादेची बंदी उठवली

February 3, 2009 3:36 PM0 commentsViews: 2

3 फेब्रुवारी, मुंबई क्रेडिट कार्डांवर लावला जाणारा इंटरेस्ट रेट 30 टक्क्यांपर्यंतच मर्यादित असावा या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेत चुकवू न शकणार्‍या ग्राहकांकडून तीस टक्क्यांपेक्षा जास्त इंटरेस्ट रेट घेऊ नये, अशी सूचना राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगानं केली होती. एच्‌एस्‌बीसी, अमेरिकन एक्स्प्रेस, सिटीबँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकांनी ग्राहक मंचाच्या या सूचनेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. क्रेडिट कार्डची थकबाकी चुकवणार्‍या अशा ग्राहकांवर या बहुराष्ट्रीय बँकांकडून नेहमीच चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त इंटरेस्ट रेट आकारला जातो. पण आता सुप्रीम कोर्टाच्या स्थगीती आदेशामुळे बँकांना तीस टक्क्यांपेक्षा जास्त इंटरेस्ट रेट घेण्यासाठी मोकळीक मिळालीय.

close