औरंगाबादमध्ये ओबीसी आणि पारधी समाजाचं आंदोलन

February 3, 2009 4:52 PM0 commentsViews: 2

3 फेब्रुवारी, औरंगाबाद औरंगाबादमध्ये दोन आंदोलनं झालीत. त्यातलं एक ओबीसी समाजाचं, तर दुसरं पारधी समाजाचं होतं. मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील पारधी समाजाच्या कुटुंबांनी उपोषण सुरू केलंय. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्यांनी हे उपोषण सुरू केलंय. हक्काच्या जमिनी द्याव्यात, पोलिसांकडून होणारा अत्याचार दूर व्हावा, सरकारी नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. ओबीसी समाजाच्या प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करू नये, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण संघर्ष समिती यांच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. याशिवाय ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यात 52 टक्के आरक्षण लागू करण्याची आंदोलनकर्त्यांनी मागणी केली.

close