‘ब्रेस्ट कॅन्सर’वर मात शक्य !

October 9, 2013 8:38 PM0 commentsViews: 561

वर्षा जहागिरदार, मुंबई

जगभरातील स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण चिंताजनक आहे. भारतासुद्धा दरवर्षी हे प्रमाण वाढताना दिसतंय. स्त्रियांच्या आरोग्याकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे यात आणखीन भर पडतेय. पण ब्रेस्ट कॅन्सरवर मात करणं शक्य आहे हे विसरुन चालणार नाही.

कॅन्सर होण्याच्या काही वर्ष आधी त्यांना स्तनांमध्ये गाठी आढळून आल्या होत्या. त्यावर त्यांनी उपचार करून घेतले.. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 2012 साली त्यांना पुन्हा स्तनांमध्ये गाठी आढळून आल्या. या वेळी मात्र निदान झालं स्तनांच्या 2nd स्टेजच्या कॅन्सरचं.

 

कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. कुटुंबाची साथ तर होतीच. पण त्यांच्याकडे दुर्दम्य अशी इच्छाशक्ती होती. उपचारादरम्यान केस जाणं हे एकवेळ स्वीकारता येतं पण स्तन काढून टाकणं हा एक प्रकारे मानसिक धक्का असतो. त्यावरही विद्या पत्केंनी हसतमुखत मात केली. आज भारतात दर 28 महिलांमागे एका महिलेला स्तनांचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यावर मात करता येऊ शकते.

close