पवारांनी फुंकले MCA च्या निवडणुकीचे रणशिंग

October 9, 2013 10:05 PM0 commentsViews: 655

sharad pawar09 ऑक्टोबर : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अखेर मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. आज शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय. पवारांनी स्वतः एमसीए ऑफिसला न जाता प्रतिनिधीकडून अर्ज भरला.

 

शरद पवारांना बाळ म्हाडदळकर गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहेत. तर विजय पाटील गटानंही पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे आज म्हाडदळकर गटाकडून आशिष शेलार यांनी आज या निवडणुकीतून माघार घेतली आहे. शेलार गोपिनाथ मुंडेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी माघार घेतल्याचं कळतंय.

 

मंगळवारी गोपीनाथ मुंडेंनी अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलाय. मी अनेक दिवस या निवडणुकीची तयारी करतोय. राजकीय हेतूने मी ही निवडणूक लढवत नाहीये. मैदानावर असलेल्या क्लब आणि एमसीएला मजबूत करणे आणि क्लबला सक्षम करणे हा माझा मुख्य हेतू आहे अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली होती.

 

मला राजकारणात क्रिकेट आणि क्रिकेट मध्ये राजकारण आणायचं नाहीये असंही मुंडे म्हणाले होते. एकंदरीतच त्यामुळे राजकारणाच्या आखाड्यात पवार आणि मुंडे यांची लढत आता एमसीएच्या निवडणुकीतही पाहण्यास मिळणार आहे.

close