बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या ‘रणरागिणीं’ची कहाणी !

October 9, 2013 11:18 PM1 commentViews: 1260

दीप्ती राऊत,औरंगाबाद
09 ऑक्टोबर : बचत गट म्हणजे पापड -लोणची हे एक ठरलेलं समीकरण. पण आता काळ बदलतोय. बायकांच्या विचारांच्या कक्षा रुंदावत आहेत आणि कामाच्याही. औरंगाबादचा पंचशील महिला गट नेमकं याचंच उदाहरण. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं जगावेगळं काम हा महिला बचत गट करतो.

 
पोलिसांचा फोन येतो आणि जय भीम नगरमधल्या महिला घटनास्थळाकडे निघतात. हातातली कामं टाकून त्या सार्‍याजणी शासकीय हॉस्पिटल (घाटी हॉस्पिटल)मध्ये पोहोचतात. पोलिसांच्या समक्ष पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतात आणि त्यावर विधीवर अंत्यसंस्कार करतात.

 
जन्माला घालण्याची वेदना सहन करणारी बाई मृत्युचं दु:ख कदाचित सहन करणार नाही या भावनेनं समाजानं बाईला मृत्यू, प्रेत, स्मशान यासार्‍यापासून दूर ठेवलं असावं. पण औरंगाबादच्या पंचशील महिला बतच गटानं ही चाकोरी मोडून टाकलीए.

 
खरं तर यांना महापालिकेचं कंत्राट मिळालंय ते बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीचं. पण त्यांचं काम कधीच त्यापलीकडे पोहोचलंय. घाटी हॉस्पिटलमध्ये नातलग टाकून गेलेले पेशंटस, गरीब रुग्ण यांच्यावरही त्या अंत्यसंस्कार करतात ते समाजसेवी भावनेनं. हे सगळ त्या का करत आहेत आणि या सार्‍यातून त्यांना काय मिळतंय. सोपं तर हे नक्कीच नाहीए. खांदा देण्यासाठी मुलगा हवा असा आग्रह असतो. पण आता या सार्‍याजणी इतरांना खांदे देत आहेत तेवढ्याच भक्कमपणे..

  • prakash

    well done all womens they deed extraodinary work

close