शरद पवारांनी दिले मुदतपूर्व निवडणुकांचे संकेत

October 10, 2013 3:36 PM0 commentsViews: 563

sharad pawar4409 ऑक्टोबर : एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील या भ्रमात राहु नका, केंद्रात तेलंगणावर वेगळा राज्याची मोहर उमटल्यामुळे आंध्रामध्ये तीव्र पडसाद उमटलेय या मुद्यावर केंद्रात नाजूक परिस्थिती आहे. त्यामुळे एखाद्यावेळेस येणार्‍या अधिवेशनात सरकार अल्पमतात जाऊन निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळे कामाला लागा असे संकेत देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश दिले आहे.

 

अशी माहिती राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिली. बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक झाली यावेळी पवारांनी मंत्र्यांना कानपिचक्या दिल्यात. निवडणुका तोंडावर आल्या असून यापुढे नेत्यांवर कोणतेही आरोप होणार नाहीत याची काळजी घ्या, असा इशारा पवारांनी मंत्र्यांना दिला.

 

अलीकडेच माणिकराव ठाकरे यांनी 19-29 असा फॉर्म्युला असावा असं विधान केलं होतं. तर राष्ट्रवादीने 22-26 असा फॉर्म्युला कायम असावा अशी मागणी केली होती. 22-26 असाच फॉर्म्युला राहिलं आणि याबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं पवारांनी या बैठकीत सांगितलं.

close